रस्ता जणू गाठला

रस्ता जणू गाठला, गाठला, गाठला |
पंढरपूरचा दैवत मजला सर्वस्व दिसला ||धृ||
पंढपुरी जाणे, पंढपुरी जाणे
माझ्या देवाची भेट घेणे
आणि देवाने दर्शन देणे
गारणे देवाला घालणे
मला पंढरपूर पाहणे ||१||
देवाचिया द्वारी, देवाचिया द्वारी
भक्त करीती वारी
पंढरीचा राजा उभा विटेवरी
ऐकावी कहाणी क्षणभरी
म्हणावे जय हरी ||२||
सारी मुले, सारी मुले,
माझ्या देवाचिया फुले
माझ्या देवाने सांगितले
सर्वस्वाचे हाल
मज आली सकाळ ||३||
गरिबाचे गारणे, गरिबाचे गारणे
माझ्या देवाने घ्यावे ऐकूण
करून तुझी सेवा, तुझ्या पायाशी राहणे
भक्त विणवितो दे मला दर्शन
माझे मागणे घ्यावे ऐकूण ||४||
देवाची ती सेवा, देवाची ती सेवा
माझा नमस्कार घ्यावा
देवा आशीर्वाद द्यावा
तोच माझा मेवा
आणि तोच माझा दिवा ||५||
– परेश पाटील

मित्र, कॉलेज आणि मी

एखाद्या दिवशी सकाळी,
कॉलेजच्या सभोवती फिरावे…
न कळता निसर्गाच्या सहवासात,
आपण सर्व इथे रमून जावे…
अरे मित्र, त्या दिवशी,
नाही का? आपण फिरत होतो…
कॉलेजच्या समोरील मैदानातून,
कोलेजकडे झेपावत होतो…
तेव्हा ती… मुलगी किती सुंदर,
बसली होती कॉलेजच्या कट्ट्यावर…
मित्रा तुझ्याकडे पाहून ती हसत होती,
खळ्या पडल्या होत्या तिच्या गालावर…
जशी स्वर्गातून परी उतरली ती,
चमकत होती ती चांदण्याहून…
मित्रा मला तू खरा सांग,
ओळख होती काय तुझी पूर्वीपासून?
तू तिच्याकडे पुन्हा पाहता,
ती लगेचच पुस्तकात लपली…
आणि तेव्हा मनाशी हसून,
अचानक काहीतरी ती पुटपुटली…
मित्रा… तेव्हा तू मला म्हणालास,
‘तू ह्या मुलीवर कविता करू शकतोस!’
कविता काय करणार मी?
तिच कविता आणि तू कवी दिसतोस…– परेश पाटील
प्रकाशित: जून २००७ 

काव्य लेखन (Poem Writing)

शाई कागत हाती घेता|
सुचली मला अशी एक कविता||
अक्षरी लिहिले कागदावरी|
लिहिले मी स्वकार्तुत्वावरी ||

स्वप्नाने जाता ती रचली|
जागा होऊनी पाहिली||
दिसली मला अशी ती रचना|
ती बसली माझ्या मना मना||

अक्षरे संपत जाता जाता|
असे म्हणाल का हि कविता||
कविता, लेखन, नाटक, गाणे|
हेच तर सर्व जीवन जगणे||

खेळ केला बाहुल्यांचा|
नाही केला तो दैवाचा||
काव्य नाही हो जड ओझे|
काव्य आहे रे सुख माझे||

नसली देवाला जरी दया|
तिची तरी हि आहे माया||
दास्याचे प्रेम नाही असे|
मातारूपी तेथेच दिसे||

रे धोकाच टळूनी गेला|
जेव्हा अक्षर नि अक्षर लिहिला||
कुठेही दिसेल येथे राम|
हे आहे काव्याचे काम||

(मात्रावृत्त-पद्दमिनी)

-परेश पाटील

मागून घ्या (Demand Now)

जे काही मागायचं असेल ते मागून घ्या
वेळ खूप कमी राहिली आहे
वेळ जाते निघून हातातून
आणि आठवणी राहतात जखम करून
ते सारं काही अचानक होतं
आणि मग आपणच रडतो हसून हसून
त्याच आठवणी पुन्हा पुन्हा
तेच शब्द वाजवितात वीणा
दूर कुठेतरी आग लागते
आणि हृदयात राहतात घर करून खुणा 
आयुष्यात खूप काही हवं असतं
जे मिळायचं ते मिळून जातं
शेवट मात्र गोड असतो
तरीही स्वप्न अपुरं राहिलं वाटतं
एकवेळ अगदी मिळणार वाटतं
स्वप्नांच्या पुढे जावून हाती येतं
मिळण्याच्या आनंदात हरवून जातो
आणि मग अलगत ते मात्र निसटू लागतं
म्हणून म्हणतो: जे मागायचं असेल ते मागून घ्या
वेळ खूप कमी राहिली आहे….
– परेश पाटील

फुलाचा जन्म (Born Flower)

शेजारच्या बागेत हिरवेगार रोप यावं 
त्यावर एखादं सुंदर फूल लागावं
त्याला सॉलिड आयटम म्हणन्यापेक्षा 
विचार असतो फूलालाफूलम्हणावं 

आवडतं तेझाडावर टवटवीत पहायला 
चमकत्या प्रकशासंगे नजरेने खेळायला 
फूल सुकून जाऊ नये म्हणून
आवडतं थोडंथोडं पाणी शिपांयला

नेहमी विचार असतो नाजुक पाकल्यांचा
रंग उडू नये अशा चार शब्दांचा 
ते फूल चुर्घलून टाकण्यापेक्षा 
छदं असतो छानशी कविता रचन्याचा 

आम्हालाही फूल काढायचं माहित असतं 
पणगंध उडू नयेहे पहावं लागतं 
तोडून, गंध घेउन टाकण्यापेक्षा
ते नेहमी पुस्तकात जपायला आवडतं 

नाजूक फूल स्वच्छंदी खेळतो 
तेव्हा कूठला तरी भुंगा गंध चोरतो 
पुस्तकात जपावयाच्या स्वप्नापेक्षा 
कोमेजून पराग मातीवर पडलेला असतो

त्या पडलेल्या फूलला कसं सावरावं?
की आपलच दुःख पाहून रडावं?
मग येवढं सारं घड्न्या पेक्षा
फूलं शेजारच्याच बागेत का यावं?

– परेश पाटील

विचार कर (Do Think)

कधी कधी मला पाहून तू हसतेस
तुला मी जोकर वाटतो काय?
तर माझ्याकडे आश्चर्याने पाहतेस
दुरून मला तू खूप पाहतेस,
जवळ आल्यावर जमीन पाहतेस!
नजरेला नजर भिडवता येतं कि नाही
काय प्रेम करायला लाजतेस?
तशी तू खूप छान दिसतेस,
मला वाटतं तू माझ्यावर मारतेस!
पण मी एक विचारतो तुला,
खरच काय माझ्यावर प्रेम करतेस?
 
मला अश्या गोष्टीत आवड नाही,
पण तुझ्या वागण्यात मला वेडा करतेस!
तुझ्यासाठी चंद्र तारे आणणार नाही,
काय तू हे मान्य करतेस?
जेव्हा मी विचारेन तुला,
तेव्हा तू ‘हो’ म्हणू शकतेस!
‘नाही’ म्हणालीस तरीही हरकत नाही,
पण मला वाटेल तू मला फसवतेस!
एवढा विचारतोय मी तुला,
अजून कसला विचार करतेस?
चालेल तू भरपूर विचार कर, पण…
तोंडावरून रुमाल फिरव, घामाने भिजतेस!
ह्या आयुष्याच्या गोष्टी आहेत,
याचा विचार करायलाच पाहिजे!
आत्ता मला तर वाटत आहे,
तू मला मनापासून पसंद करतेस!
अरे! पुन्हा… तू हसतेस!
तुला मी जोकर वाटतो काय?
तर माझ्याकडे आश्चर्याने पाहतेस…

-परेश पाटील