Perfection

There is no matter who is faulty or who is guilty? All creations are not perfect, each and every creation has scarcity even created by God. Some points are deficient as per our demands, so be calm and keep your journey continue…

– Paresh Patil

खूप काही सांगते माझी आई

खूप काही सांगते माझी आई
काय आणि किती गाऊ तिची गुणगाई

ती बोलते, बोलतोस तू किती कमी,
आणि राजा लिहतोस जास्त!
मनातलं बोलत जा जरा,
उगाच नको बसू स्वस्थ!

ती म्हणते, एवढा हुशार आणि शहाणा तू
उगाच कशाला डोळ्यात तुझ्या पाणी ?
लोकांचं मनाला नाही लावायचं वेड्या,
मला माहित आहे ना तुझी कहाणी..

ती विचारते, स्वतः समजू शकतोस ना तू?
मग कुणाची गरज काय तुला?
तीरासारखे शब्द आहेत ना तुझे,
मग गाफील राहतोस कशाला?

ती सांगते, तुला आहे माझा आशीर्वाद,
आणि वडिलांचा पाठीवर हात!
गाढून टाक एकदाचे अटकेपार झेंडे,
नंतर बघ कडकडतील लोकांचे दात!

– परेश पाटील

काव्य लेखन (Poem Writing)

शाई कागत हाती घेता|
सुचली मला अशी एक कविता||
अक्षरी लिहिले कागदावरी|
लिहिले मी स्वकार्तुत्वावरी ||

स्वप्नाने जाता ती रचली|
जागा होऊनी पाहिली||
दिसली मला अशी ती रचना|
ती बसली माझ्या मना मना||

अक्षरे संपत जाता जाता|
असे म्हणाल का हि कविता||
कविता, लेखन, नाटक, गाणे|
हेच तर सर्व जीवन जगणे||

खेळ केला बाहुल्यांचा|
नाही केला तो दैवाचा||
काव्य नाही हो जड ओझे|
काव्य आहे रे सुख माझे||

नसली देवाला जरी दया|
तिची तरी हि आहे माया||
दास्याचे प्रेम नाही असे|
मातारूपी तेथेच दिसे||

रे धोकाच टळूनी गेला|
जेव्हा अक्षर नि अक्षर लिहिला||
कुठेही दिसेल येथे राम|
हे आहे काव्याचे काम||

(मात्रावृत्त-पद्दमिनी)

-परेश पाटील

मागून घ्या (Demand Now)

जे काही मागायचं असेल ते मागून घ्या
वेळ खूप कमी राहिली आहे
वेळ जाते निघून हातातून
आणि आठवणी राहतात जखम करून
ते सारं काही अचानक होतं
आणि मग आपणच रडतो हसून हसून
त्याच आठवणी पुन्हा पुन्हा
तेच शब्द वाजवितात वीणा
दूर कुठेतरी आग लागते
आणि हृदयात राहतात घर करून खुणा 
आयुष्यात खूप काही हवं असतं
जे मिळायचं ते मिळून जातं
शेवट मात्र गोड असतो
तरीही स्वप्न अपुरं राहिलं वाटतं
एकवेळ अगदी मिळणार वाटतं
स्वप्नांच्या पुढे जावून हाती येतं
मिळण्याच्या आनंदात हरवून जातो
आणि मग अलगत ते मात्र निसटू लागतं
म्हणून म्हणतो: जे मागायचं असेल ते मागून घ्या
वेळ खूप कमी राहिली आहे….
– परेश पाटील